मासे (Fish) – माशांमध्ये डिफलायोबोथेरियम कृमी आढळून येतात. हे कृमी म्हणजे टेपवॉर्मचं एक जनुक आहे. जर अपूर्ण शिजलेले मासे खाण्यात आले तर अशा माशांमुळे टेपवॉर्म मानवी शरीरात थेट प्रवेश करण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारचा टेपवॉर्म पाण्यातील मोठ्या प्राण्यांमध्येही आढळतो जे प्राणी लहान प्राण्यांसह माशांनाही खातात.
पोर्क (Pork) - पोर्क म्हणजेच डुकरांच्या मांसातदेखील टेपवॉर्म आढळतं. त्यामुळेच पोर्क योग्य पद्धतीनं शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. एका व्यक्तीने सुशीचे (चायनीज डिश, ज्यात मांसाहाराचा समावेश असतो) अतिरिक्त सेवन केलं. त्यानंतर टेपवॉर्ममुळे त्याच्या शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना चीनमध्ये घडली होती. पोर्क टेपवॉर्म टीनिया सोलिअम या नावानंदेखील ओळखला जातो.
बीफ (Beef) – अपूर्ण शिजलेले बीफ जर खाण्यात आलं तर त्या माध्यमातून देखील टेपवॉर्म मानवी शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. ज्या जनावरांना याचा संसर्ग झाला आहे, त्यांच्या माध्यमातूनच टेपवॉर्म मानवी शरीरात प्रवेश करतात. जेव्हा एखादा माणूस संसर्ग झालेल्या जनावराचं मांस सेवन करतो, तेव्हा माणसाच्या आतड्यावर परिणाम झाल्याचं दिसून येते.
केल (Kale) – ही कोबीवर्गीय भाजी आहे. ही फूल आणि कोबीच्या पानांपासून उगवते. यातही टेपवॉर्म आढळतो. ही अळी यकृतात पोहोचून गळू तयार करते. त्यामुळे पू होऊ लागतो. ही अळी डोळ्यांमध्येदेखील जाऊ शकते. आपण सेवन केलेल्या अन्नालाच ती आपला आहार बनवते. ज्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत ही अळी पोहोचते, त्या व्यक्तीस अटॅक येण्याची शक्यता असते. सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण नंतर डोकेदुखी, थकवा आणि व्हिटॅमिन्सची कमतरता अशी लक्षणं दिसू लागतात. डोक्यात अंड्यांमुळे दबाव किंवा प्रेशर वाढल्याने मेंदूचं कार्य थांबू लागतं.
ब्रोकोली (Broccoli) - ब्रोकोली ही कोबीवर्गीय भाजी आहे. या भाजीची फुलंही खाल्ली जातात. ब्रोकोलीत टेपवॉर्मची अंडी आढळून येतात. एका टेपवॉर्मची लांबी 3.5 ते 25 मीटर असते. त्यांचं जीवनमान 30 वर्षे असतं. ही अळी नष्ट होण्यासाठी औषधपोचार केले जातात. वेळप्रसंगी शस्त्रक्रिया देखील करावी लागते. या अळीच्या 5 हजार प्रजाती असल्याचं सांगितलं जातं.