रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन - न्यूजवीकच्या म्हणण्यानुसार, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या रुटीन बद्दल अत्यंत काटेकोर आहेत. पुतिन रात्री बरेच तास काम करतात आणि सकाळी उशिरा पर्यंत झोपतात. ब्रेकफास्टमध्ये ते कॉटेज चीज म्हणजे आपलं पनीर, दलिया किंवा एक आमलेट एवढंच खातात आणि ज्यूस पितात. कॉफी किंवा दोन तास स्विमिंग करतात. मग वेट लिफ्टिंग करतात.
जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल - जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष अँजेला मर्केल यांनी आपल्या आयुष्याची 35 वर्षं कम्युनिस्ट पूर्व जर्मनीमध्ये घालविली. स्टोअरमध्ये लांबच लांब रांगा असायच्या. सुरुवातीच्या काळात, मर्केलासुद्धा रांगेत उभे राहू नये म्हणून फूड पॅकेट्स साठवण्याची सवय होती. ही सवय आजही तशीच आहे. मर्केल अजूनही खायचे जिन्नस जमा करून ठेवते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी: नरेंद्र मोदी यांना मुलांचे कान धरण्याची किंवा कान पिळण्याची सवय आहे. मोदींना लहान मुलं खूप आवडतात. मुलांबरोबर मोदींची अशी अनेक छायाचित्रं आहेत, ज्यात ते मुलांचे कान धरताना दिसले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरबरोबरचा हा फोटो. कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंच्या मुलाचा कान धरतानाचाही त्यांचा फोटो आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खाण्या-पिण्याची एक सवय आहे. इम्रान खान यांची दुसरी पत्नी रेहम खान यांनी एका मुलाखतीत सांगितले होतं की, इम्रान खान खाण्या-पिण्याच्या बाबतीत खरोखरच निष्काळजीपणा करतात. अनेकदा ते नोकरांच्या घरातून जेवण मागवून खातात. आणि कधीकधी ते जेवण न करताच झोपी जातात.