तुम्ही हिरवी द्राक्षं खाल्ली असतील, काळी द्राक्षंही खाल्ली असती. या फोटोतील ही लालबुंद द्राक्ष पाहून ती खाण्याचाही मोह तुम्हाला आवडला नसेल. पण त्यासाठी लाखो रुपये तुमच्याकडे हवेत.
2/ 7
हे सर्वात महाग द्राक्ष आहे. रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman grapes) असं या द्राक्षांचं नाव आहे. ही दिसायला जितकी सुंदर तितकीच त्याची किंमतही भारी अगदी. अगदी सोन्याच्या भावात ही द्राक्षं विकली जातात.
3/ 7
रूबी रोमन द्राक्षे हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. या प्रत्येक द्राक्षाचं वजन 20 ग्रॅम असतं आणि ते पिंगपाँग बॉलच्या आकाराचे असतात. मात्र, यातील काही द्राक्षे तीन सेमी इतके मोठेही असतात.
4/ 7
दरवर्षी या प्रकारच्या द्राक्षांच्या केवळ 2,400 गडांचं उत्पादन घेतलं जातं. अत्यंत साध्या पद्धतीनं याची शेती केली जाते. द्राक्षाची शेती जपानी लक्झरी फळांच्या बाजारात अत्यंत डिमांडिंग आहे.
5/ 7
2008 साली रूबी रोमन द्राक्षाची पहिल्यांदा प्रीमियम द्राक्षाच्या नव्या रुपात सुरुवात झाली. Orissapost.com च्या वृत्तानुसार, सर्वात महागड्या द्राक्षांची निर्मिती करण्यासाठी 14 वर्ष प्रयत्न आणि गुंतवणूक करावी लागली. तेव्हा जाऊन ही शेती करणं शक्य झालं
6/ 7
प्रत्येक द्राक्षाची गुणवत्ता तपासली जाते. यातून जे द्राक्षे निवडले जातात त्यावर सर्टिफिकेशन सेल ठेवलं जातं. हे द्राक्षे विकण्यासाठी कडक नियम आहेत.
7/ 7
या एका द्राक्षाची किंमत सुमारे 35 हजार रुपये आहे. एक किलो द्राक्षं घ्यायची असतील तर भारतात तुम्हाला यासाठी तब्बल 750,000 रुपये मोजावे लागती.