कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गालबोट लागलं आहे. कोल्हापुरात झालेल्या आंदोलनादरम्यान एका खासगी प्रवासी बसवर दगडफेक करण्यात आली. एसटी आंदोलनादरम्यान खासगी बसवर झालेल्या दगडफेकीत बसचा चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या हल्ल्यात खासगी बसच्या काचा फुटल्या अशून मोठं नुकसान झाल्याचा दावा बसच्या चालकानं केला आहे. पंकज ट्रॅव्हलच्या बसवर संपकऱ्यांनी दगडफेक केली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसवरदेखील काही समाजकंटकांनी सकाळी 11 वाजता दगडफेक केली होती. बोरीपारधी या ठिकाणी ही घटना घडली होती.