

अनेकदा आपण कॅलेंडरवर किंगफिशर नावाचा पक्षी पाहत असतो. पण इतर पक्षांच्या तुलनेत हा पक्षी वेगळा असून त्याच्या या विचित्र सवयीमुळे इतर पक्षांच्या तुलनेत हा वेगळा ठरतो. ही चिमणी आपल्या वजनाच्या 24 पट अधिक अन्न एका दिवसात खाते. मासे आणि साप हे या पक्षाचं अन्न आहे. जाणून घेऊया किंगफिशरबद्दल काही महत्वाच्या गोष्टी


किंगफिशर हा कोरासीफोर्म्स समुहामधील पक्षी आहे. या पक्षाच्या जवळपास 90 प्रजाती असून त्या ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशियामध्ये आढळून येतात. या पक्षांचं मोठे डोकं, लांब आणि धारदार चोच, लहान पाय आणि लांबसडक शेपटी असते. त्याच्या या शरीररचनेमुळे त्याला वेगवान शिकार करता येते.


दिवसभरात हा पक्षी कमीतकमी चारवेळा खातो. त्याचबरोबर जेवण अधिक झालं आणि ते पचलं नाही तर उलटी करून तो बाहेर टाकतो. त्यानंतर पुन्हा तो शिकार करून भोजन करतो. आपल्या वजनाच्या 24 ते 26 पट अधिक तो खातो. माशांची आवड असणारा हा पक्षी दिवसातून 8 ते 10 मासे खातो तसंच न पचल्यास उलटीवाटे बाहेर टाकतो.


हा पक्षी आपल्या जोडीराबरोबर आणि कुटुंबाबरोबर खूप प्रामाणिक असतो. एक मादी किंगफिशर एकावेळी 6 अंडी घालते. काही प्रजाती जास्त अंडीदेखील देतात. तसंच प्रजननादरम्यान मादी आणि नर बरोबरीने अंडी उबवून त्यांची संरक्षण करतात.


किंगफिशर हा लाजाळू स्वभावाचा पक्षी समजला जातो. परंतु माणसाशी याचा घनिष्ट संबंध असून बेटांवर राहणाऱ्या व्यक्तींशी जास्त संबंध येतो. ऑस्ट्रेलियामधील अनेक समुदायांमध्ये त्यांना पवित्र मानून त्यांची पूजा करण्यात येते. समुद्राशी टक्कर घेणारा हा पक्षी समुद्री देवतांशी जवळीक असलेला पक्षी मानला जातो. त्याचबरोबर अनेक आदिवासी समुदायांमध्ये याची पूजा केली जाते.


या पक्षाला अनेक ठिकाणी अपशकुनी समजलं जातं. इंडोनेशियामधील बेटांवर ओरिएंटल किंगफिशरचं दिसणे अपशकुन मानला जातो. जुन्या काळात योद्धे युद्धासाठी जात असताना त्यांना हा पक्षी दिसला तर ते अपशकुन समजून काही दिवस जाण्याचं टाळत असत.