

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला. तो डिप्रेशनमध्ये (depression) असल्याची माहिती समोर आली. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही कुणी सावरलं नाही. अशात काही दिवसांपासून डिप्रेशनशी लढत असलेल्या आणखी एका अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील (social media) पोस्टने खळबळ उडवली.


कन्नड अभिनेत्री (Kannada Actress) आणि बिग बॉस-3 ची (Bigg Boss 3) स्पर्धक जयश्रीने (Jayashree Ramaiah) आपल्या फेसबुकवर (Facebook) आपण जग सोडत असल्याची पोस्ट केली. ही पोस्ट पाहून सर्वजण शॉक झाले.


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार जयश्री गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनचा सामना करते आहे. कौटुंबिक परिस्थितीसह ती आपल्या कामाबाबतही चिंतेत आहे, अशी माहिती अभिनेत्री अश्विती शेट्टीने दिली.


आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही आहे असं अनेकदा जयश्रीने आपल्याला सांगितल्याचं अश्विती म्हणाली. सर्वकाही चांगलं होईल असा विश्वासही आपण तिला दिला होता. मात्र जयश्री अनेकदा आपला फोन नंबर बदलत राहायची त्यामुळे तिच्या संपर्कात राहणं शक्य होत नव्हतं, असंही अश्विती म्हणाली.


चार महिन्यांपूर्वी जयश्री आपल्या घरी गेली आणि आपल्या नव्या आयुष्यात आपण खूश असल्याचं तिनं सांगितलं, असं अश्विती म्हणाली. काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर तिला मेसेज केला तेव्हा तिनं सर्वकाही ठीक असल्याचं सांगितलं. मात्र आज सकाळी जेव्हा तिची फेसबुकवर ही पोस्ट पाहिली तेव्हा आम्ही हैराण झाल्याचं अश्वितीने सांगितलं.


अश्विनी म्हणाली, जयश्रीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रुग्णालयात दाखल असल्याचं समजलं. तिला डिस्चार्ज देण्यात आला होता आणि पुन्हा रुग्णालयात आणलं होतं. मात्र ती रुग्णालयात जाण्यास नकार देत होती, अशी माहिती मला मिळाली.


जयश्रीने फेसबुकवर ही पोस्ट करताच त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली.


सोशल मीडियावर सातत्याने येणाऱ्या प्रतिक्रियेनंतर जयश्रीने आपल्या फेसबुकवरील जुनी पोस्ट डिलीट केली आहे आणि नवी पोस्ट करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं.