

मुजोर चीननं पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यातील प्रकरणानंतर शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले जात होते मात्र चीनकडून सतत्यानं कुरापती सुरूच आहेत. (फोटो-AFP)


सध्या चुशूलमध्ये दोन देशांच्या सैन्यादरम्यान ब्रिगेड कमांडर पातळीवर चर्चा सुरू आहे. असा विश्वास आहे की यावेळी पैंगोग लेकच्या दक्षिण काठावरील परिस्थितीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी भारत आणि चीन यांच्यात मेजर जनरल स्तरीय चर्चा झाली होती.(फोटो-AFP)


चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने एका संपादकीयमध्ये म्हटले आहे की, जर भारताला आमच्याशी स्पर्धा करायची असेल तर आम्ही त्यांच्या लष्कराचे आणखी नुकसान करू. याआधी ग्लोबल टाइम्सनं भारताविरुद्ध अनेकदा भाष्य केले आहे. (फोटो-AFP)


ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयात लिहिले आहे, "भारताने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी चिनी सैन्याच्या कारवाया थांबविल्या आहेत. यावरून हे दिसून येते की भारतीय सैन्याने प्रथम विंडशील्ड घेतला आणि यावेळी भारतीय सैनिकांनी संघर्ष सुरू केला. (फोटो-AFP)


ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे, भारत आपल्या घरगुती समस्यांमुळे त्रस्त आहे, विशेषत: कोरोनाची परिस्थिती जी पूर्णपणे नियंत्रणात नाही. रविवारी भारतात कोरोनाची 78 हजार नवीन प्रकरणं आढळून आली. भारताची आर्थिक स्थितीही वाईट आहे. सीमेवर अशी चकमक करून देशातील समस्यांकडून लक्ष हटवण्याचे काम केले जात आहे. (फोटो-AFP)


तसेच, ग्लोबल टाइम्सनं जर भारताला शांततेत सहजीवन हवे असेल तर ते स्वागतार्ह आहे. पण जर भारताला कोणत्याही प्रकारे आव्हान करायचे असेल तर चीनकडे भारतापेक्षा अधिक शस्त्रे आणि क्षमता आहे. जर लष्करी क्षमता भारताला दाखवायची असेल 1962 पेक्षा जास्त नुकसान भारताचे होईल. (फोटो-AFP)


चीननं पैंगोग त्सो झील परिसरात पुन्हा एकदा अंधाराचा फायदा घेऊन घुसखोरीचा प्रयत्न केला मात्र जवानांनी हा घुसखोरीचा डाव उधळून लावला. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. अरुणाचल ते लडाख या संपूर्ण भागात सैन्याला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.(फोटो-AFP)


दरम्यान सॅटलाइन फोटोमधून पूर्व लडाखमध्ये चीनच्या भागात हेलिपॅड तयार करण्यात आल्याचे फोटो समोर आले आहेत. लडाखमध्ये भारत-चीन सीमारेषेवर चीन आपलं सैन्य वाढवत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (फोटो-AFP)


पूर्व लडाखमधील पैंगोग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, अशी माहिती सैन्याने दिली. मात्र चिनी लष्कराने केलेल्या या प्रयत्नामध्ये भारतीय सैन्याला येथील महत्वाच्या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे.(फोटो-AFP)