Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
PHOTOS तिवरे दुर्घटना: एक होतं धरण... रात्रीत गाव वाहून नेलं!
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालूक्यात असलेले तिवरे धरण फुटल्याने भेंडवाडी गावातील 13 घरे वाहून गेली आहेत. गावातील 25 जण बेपत्ता असून त्यापैकी 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. धरण फुटल्यानंतरचे फोटो पाहिल्यानंतर या दुर्घटनेची तीव्रता लक्षात येते.
2/ 17


रात्री 10च्या सुमारास धरण फुटल्यामुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांना अलर्ट देण्यात आला आहे.
6/ 17


आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनास्थळी NDRF आणि जिल्हा प्रशासनाचे पथक दाखल झाले आहे.
8/ 17


तिवरे धरण हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे सदर धरणाची साठवणूक क्षमता 2.452 दशलक्ष घनमीटर / 0.08 टीएमसी येवढी आहे.
9/ 17


हे धरण फुटल्यामुळे तिवरे व धणेगाव यांना धोका आहे. पुढे जाऊन हे पाणी वाशिष्टी नदीला जाऊन मिळते.
14/ 17


या घटनेनंतर मदतकार्य तातडीने सुरु करण्यात आले. पण या परिसरात सतत पाऊस पडत असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.