आज ३१ मार्च आहे, कामे करुन घ्या; उद्यापासून होतील हे बदल!
नवी दिल्ली, 31 मार्च: उद्या म्हणजेच १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. निवडणुकांच्या तोंडावर 1 एप्रिलपासून नव्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अपडेट अथवा पूर्ण करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे.


पॅनकार्ड- जर तुम्ही पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले नसल तर 31 मार्च ही शेवटची तारिख आहे. पॅन-आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही.


चॅनेल पॅकेच निवडण्याचा शेवटचा दिवस- ट्रायच्या नव्या नियमांनुसार 31 मार्चपर्यंत टीव्ही चॅनेल्सचे पॅकेज निवडायची आहेत. जर असे केले नाही तर एक एप्रिलपासून डीडीएच सेवा विस्कळीत होऊ शकते. इतक नव्हे तर त्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागू शकते.


कर्ज घेताय- 1 एप्रिलपासून बदल होणाऱ्या गोष्टीमधील आनंद देणारी बातमी म्हणजे बँकेची कर्जे उद्यापासन स्वस्त होऊ शकतात. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्याने बँकांनाही व्याजदर कमी करावे लागणार.


नव्या गाड्याचे नंबर प्लेट-उद्यापासून शोरूममधून विकल्या जाणाऱ्या मोटारींवर नंबर प्लेट बसवणे बंधनकारक होणार आहे. तसेच मोटारींच्या विंडस्क्रिनवर त्या गाडीच्या इंधनाचा प्रकाराचा उल्लेख करावा लागणार आहे.


तुमची दुचाकी होणार अधिक सुरक्षित- उद्यापासून 125 सीसी पेक्षा अधिक क्षमता असलेल्या दुचाक्या कंपन्यांना अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम देने अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे अपघात टाळता येणे शक्य होणार आहे.


या दोन बँका होणार एक- 1 एप्रिलपासून देना बँक आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये उद्या विलिनीकरण होणार आहे. देना व विजया बँकेचे ग्राहक उद्यापासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक होतील. या सर्व ग्राहकांना नवे एटीएम कार्ड आणि चेकबूक दिले जाणार आहे.


PF खातेधारकांसाठी महत्त्वाचे- जर तुम्ही १ एप्रिल नंतर नोकरी बदलणार असाल तर आपल्या जुन्या भविष्य निर्वाह निधीचे खात्यातून पैसे नव्या पीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेतून मुक्ती मिळेल. नव्या नियमांनुसार तुमचे नवे खाते स्वत:हून जुन्या खात्याशी जोडले जाणार आहे.


वीजेचे प्रीपेड मीटर- देशभरात वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण एक एप्रिलपासून वीज ग्राहकांसाठी वीजेसाठी प्रीपेड मीटर मिळण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे ग्राहकांना जितकी वीज वापरायची आहे तितकेच बील सुरुवातीला भरता येणार आहे. या मीटर्सचे ऑनलाईन रिचार्च करता येईल.