

हैदराबादच्या हुमांयु नगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका सुनेने आपल्या सासूला भररस्त्यात मारहाण केली. या प्रकरणात सुनेविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.


सून आपल्या सासूला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये सून आपल्या सासूला मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्यानुसार सून आपल्या 55 वर्षीय सासूला पहिल्यांदा केसांना पकडून फरफटत रस्त्यावर आणते त्यानंतर तिच्या थोबाडीत मारते.


सीसीटीवीमधून हे स्पष्ट झालं की सून आपल्या सासूला अत्यंत क्रुरपणे मारहाण करीत आहे. यावेळी तिच्याजवळ उभा असलेला मुलगा या प्रकरणाता व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट करीत आहे.


सीसीटीवी फुटेज पाहताना असं दिसतंय की काही महिला सूनेला समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ती कोणाचंही ऐकत नाही. त्यानंतर यादरम्यान कोणीच त्या वृद्ध महिलेसा वाचविण्यासाठी येत नाही.


सीसीटीवी फुटेज वायरल झाल्यानंतर पोलिसांनी सून आणि तिच्या आईविरोधात आयपीसी 323 कलमाअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. सांगितले जात आहे की सासूने सुनेच्या मजल्यावरील वीज आणि पाणी बंद केलं होतं, त्यानंतर मारहाण सुरू झाली.