आजपासून पाच दिवस स्वस्तात करा सोनं खरेदी, असा घ्या फायदा
तुम्हीदेखील स्वस्तात सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. सरकारची सॉवरेन गोल्ड स्कीम पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरू झाली आहे. आपण आजपासून म्हणजेच 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत या योजनेत गुंतवणूक करू शकता.


तुम्हीदेखील स्वस्तात सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. सरकारची सॉवरेन गोल्ड स्कीम (Sovereign Gold Bond) पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरू झाली आहे. आपण आजपासून म्हणजेच 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत या योजनेत गुंतवणूक करू शकता.गोल्ड बॉन्डसाठी सरकारनं यावळी इश्यू प्राईस 4,662 रुपये प्रतिग्राम म्हणजेच 46,620 रुपये प्रति 10 ग्राम इतकी निश्चित केली आहे.


कुठून विकत घेता येणार - सॉवरेन गोल्ड बॉन्ड विकत घेण्यासाठी तुमच्याकडं पॅनकार्ड असणं गरजेचं आहे. गुंतवणुकदार हा बॉन्ड ऑनलाईनही खरेदी करू शकतात. याशिवाय बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काही पोस्टाची कार्यालये, एनएसई आणि बीएसईसारखे स्टॉक एक्सचेंज इथूनही तुम्ही बॉन्ड खरेदी करू शकता.


किती सोनं खरेदी करू शकता - सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती कमाल 400 ग्रॅम सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकतो. तर, किमान गुंतवणुक 1 ग्रॅम असणं गरजेचं आहे. या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता. हे बॉन्ड ट्रस्टी, HUF, ट्रस्ट, धार्मिक संस्था आणि महाविद्यालयांना विकण्यास मनाई आहे.


काय आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड - गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकदाराला प्रत्यक्ष सोनं मिळत नाही. हे सोनं प्रत्यक्षरित्या किंवा फिजिकलपेक्षा अधिक सुरक्षित असतं. यावर तीन वर्षानंतर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. याचा कर्ज घेण्यासाठी वापर करता येतो.