

कार कंपनी होंडा (Honda Cars India) आपल्या अनेक मॉडल्सवर सप्टेंबरमध्ये 2.50 लाखांपर्यंत सूट देत आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारात एकूण 7,509 यूनिट्सला विकले होते. गेल्या काही वर्षात यामध्ये 9.43 टक्के घट पाहायला मिळत आहे. महिन्यांचा विचार केला तर यामध्ये 39.49 टक्क्यांचा फायदा झाला आहे. आता सप्टेंबर महिन्यात आपली सेल्य वाढविण्यासाठी कंपनी ग्राहकांना चांगल्या ऑफर्स देत आहे. कंपनी आता Honda Amaze, Honda WR-V आणि Honda Civic वर ही आॅफर्स देत आहे.


वर्तमानमध्ये होंडा अमेजची किंमत 6.10 लाख रुपयांपासून ते 9.96 लाख रुपयांदरम्यान आहे. इंजन ऑप्शनच्या स्वरुपात ग्राहकांना 1.2-लीटर, i-VTEC पेट्रोल (90PS and 110Nm) आणि 1.5-litre, i-DTEC डीजेल (100PS and 200Nm) चा पर्याय मिळत आहे.


Honda WR-V (पेट्रोल/डीजेल) - या कारवर तुम्हाला 20 हजार रुपयांपर्यंत ऑफर मिळू शकेल. नवी होंडा WR-V वर सप्टेंबर 2020 मध्ये 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळत आहे.


कंपनीने नव्या वर्षी जुलैमध्ये WR-V चं नवीन मॉडल लॉन्च केलं होतं. ज्याची किंमत दिल्लीत 8.50 लाखांपासून ते 11 लाखापर्यंत होती. या कारच्या पॉवर जेनरेशन पर्यायाबद्दल सांगायचं झालं तर 1.2-लीटर, i-VTEC (पेट्रोल/डीजेल) (90PS and 110Nm) आणि 1.5-लीटर, i-DTEC डीजेल (100PS and 200Nm) का पर्याय मिळेल.


Honda Civic (पेट्रोल/डीजेल) - होंडा सिविक वर तुम्हाला 2.5 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळत आहे. होंडा सिविक पेट्रोलवर 1 लाख रुपयांचं कॅश डिस्काउंट मिळत आहे. डिलेज इंजन मॉडलवर हा डिस्काउंट 2.50 लाख रुपयांपर्यंत आहे.