शुद्ध शाकाहारी आहात? प्रोटीन सोर्सची चिंता नको; जाणून घ्या तुमच्यासाठी पर्याय
Protein Foods For Vegetarian : आपल्या देशात शाकाहारी लोकांना हाय प्रोटीन मिळवण्यासाठी फक्त पनीर हाच पर्याय आहे, असं नाही. काही पदार्थ असेही आहेत ज्याच्यांमधूनही मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळू शकतं. त्याविषयी जाणून घेऊया.
प्रोटीन (Protein) मसल्सला मजबूत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयोगी येतं. पण, शाकाहारी (Vegetarian) माणसांना प्रोटीन योग्य प्रमाणात मिळत नाही. शाकाहारी लोकांसाठी दूध किंवा पनीरसारखे पदार्थ प्रोटीनचा सोर्स असतात.
2/ 8
प्रोटीन आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक आहे. आपले स्किन सेल्स आणि बॉडी सेल्स यांच्या निर्मितीत मदत होते. तर, मेमरी सेव्हींग आणि डायजेशन साठीही आवश्यक आहे. त्यामुळे मांसाहारी लोकांप्रमाणे शाकाहारी लोकांची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी आणखीनही पर्याय उपलब्ध आहेत.
3/ 8
डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. 18 ग्रॅम डाळ दररोज खाल्ल्यास शरीरातली प्रोटीनची गरज भागते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम आणि आयर्न असतं. त्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम कमी होतात.
4/ 8
शेंगदाणे आणि राजमा देखील प्रोटीनचा सोर्स आहेत. त्यात कार्बोहाइड्रेड, फायबर, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नीज, कॅल्शियम यांचा साठा असतो. याशिवाय यात व्हिटामीन आणि मिनरल्सही असतात.
5/ 8
विविध बियांमध्ये प्रोटीन असतात. त्याबरोबर ओमेगा-3. फॅटी ऍसिड,कॅल्शिअम, आयर्न आणि सेलेनिअम हे भरपूर मात्रेत असतं. बिया किंवा चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी आणि शरीरात थंडावा राहण्यासाठी नक्की खावे.
6/ 8
पनीरमध्ये 80 ते 86 टक्के प्रोटीन असतं. त्यात अमीनो ऍसिडही असतं. व्हेजिटेरीयन लोकांसाठी प्रोटीनसाठी चांगला पर्याय आहे. 40 ग्रॅम पनीरमध्ये 7.54 ग्रॅम प्रोटीनम असतं.
7/ 8
सोयाबीन्स प्रोटीनचा रिच सोर्स आहे. यात कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्व असतात. सोयाबीनमध्ये फॅटही कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारातला हा चांगला ऑप्शन आहे.
8/ 8
शाकाहारी लोकांना प्रोटीनसाठी ब्रोकली हा उत्तम पर्याय आहे. याला प्रोटीन पॉवर पॅकही म्हटलं जातं. ब्रोकली मध्ये आयर्न, व्हीटामिन्स आणि मिनरल्सही असतात.