तुळशी- तुळशी हे प्रत्येक भारतीय घराचे सौंदर्य आहे. तुळशी चयापचयाचा ताण कमी करते आणि रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. इतकेच नाही तर तुळशीच्या सेवनाने मानसिक ताणही कमी होतो. तुळशीमध्ये आढळणारा युजेनॉल हा रेणू रक्तवाहिन्या आकुंचन पावणारी आणि रक्तदाब कमी करणारी रसायने दूर करतो. तुम्ही तुळशीची काही पाने चावून खाऊ शकता किंवा चहामध्ये घालू शकता.
दालचिनी- दालचिनी प्रत्येक भारतीय घरातील स्वयंपाकघरात आढळते. याचा वापर गरम मसाला म्हणून केला जातो. रक्तदाब कमी करण्यासाठी दालचिनी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यात अँटिऑक्सिडेंट तसेच अँन्टी इम्पलेमेंटरी गुणधर्म आहेत. दालचिनीच्या गुणधर्मांमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
हळद - आयुर्वेदात हळदीचे अनेक फायदे सांगितले आहेत. कोविड-19 नंतर हळदीची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे रसायन असते, जे एक परिणामकार अँटिऑक्सिडेंट आहे, मधुमेहाच्या उपचारात त्याचा फायदा होतो. हळदीचा वापर भाज्या आणि कडधान्यांपासून ते दुधात घालून पिण्यापर्यंत करता येतो आणि अनेक आजार दूर ठेवता येतात.