भारतात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. सरकारनं लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, मग फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यानंतर वयस्कर व्यक्तींना लस दिली जाणार आहे.
2/ 7
जानेवारीत आरोग्य कर्मचाऱ्यांचं आणि फेब्रुवारीत फ्रंटलाइन वर्कर्सचं लसीकरण सुरू झालं. त्यांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. 13 फेब्रुवारीपासून दुसरा डोस दिला जाणार आहे.
3/ 7
पण या कालावधीत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लशीचा पहिलाच डोस मिळाला नाही त्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो.
4/ 7
यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना mop-up vaccine sessions सुरू करण्यास सांगितलं आहे. यामध्ये ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस मिळाली ना, त्यांना लस दिली जाणार आहे. नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
5/ 7
24 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि 6 मार्चपर्यंत फ्रंटलाइन वर्कर्सना मॉप अप राऊंड अंतर्गत कोरोनाचा पहिला डोस घेता येऊ शकतो.
6/ 7
प्राधान्य गटातील सर्वांना लस मिळावी यासाठी राज्ये त्यांच्या सोयीनुसार अधिकाधिक मॉप अप राऊंड्स घेऊ शकतातही असंही केंद्रानं सांगितलं.
7/ 7
मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लोकांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती आणि मधुमेह, हायपरटेन्शन असे इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.