औषधांना कंटाळलात? डायबेटिससाठी ‘हे’ घरगुती उपायही करून पहा
डायबेटीस (Diabetes) असेल तर, लाइफस्टाईल बदलून आणि मेडिकेशन करून कंट्रोल (Control) करता येतो. काही घरगुती उपाय (Home Remedies) टाइप 2 डायबिटीसमध्ये उपयोगी पडतात.
मधुमेहापासून बचावण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकजण सर्वतोपरी प्रयत्न करतात. लाईफस्टाईल बदलून आणि मेडिकेशनने डायबेटीस कंट्रोल (Diabetes Control) करता येतो.
2/ 8
डायबेटीस आता सर्वसामान्य आजार बनलेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही ओषधं घेऊन डायबेटीज नियंत्रणात येतो. मात्र बरा होत नाही. काही घरगुती उपाय (Home Remedies) टाईप 2 डायबिटीजमध्ये उपयोगी पडतात.
3/ 8
टाइप 2 डायबेटीसमध्ये कोरफडचा वापर करता येतो. त्यात अँटीऑक्सिडेंट आहेत जे, बीटा सेल्स रिपेर करण्यात खूप उपयुक्त आहे. डायबेटीसचे रुग्ण कोरफडची स्मूदी किंवा कॅप्सूल ही घेऊ शकता.
4/ 8
सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात मिळणारी दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करु शकते. पण, यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी दालचिनी खा. दररोज 1 ग्रॅम दालचिनी खल्ली तर, मधुमेहाला दूर ठेवू शकता.
5/ 8
आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आणि पानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात आणि मधुमेहापासून बचाव होते. मधुमेहाच्या त्रासात शेवग्याच्या शेंगांच्या वापराने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात.
6/ 8
कडुलिंबाच्या पानांमध्ये इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हीटी वाढविण्याची, ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवण्यासची क्षमता आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा.
7/ 8
मधुमेह टाळायचा असेल तर, दररोज रिकाम्या पोटी 2 ते 3 तुळशीची पानं चावून खावीत. तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडंट असतं. जे इंसुलिन रिलीज करण्याबरोबर शरीरातील पेशी हेल्दी ठेवतं.
8/ 8
दररोज मेथी दाण्यांचं खाऊन ब्लड शुगर नियंत्रित करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने फायदा होतो.