सध्या बाजारात तोंडली मोठ्या प्रमाणात दिसून येतं आहे. तोंडली ही आरोग्यासाठी उत्तम अशी भाजी आहे. मात्र बऱ्याच लोकांना त्याच्या गुणधर्मबाबत फारशी माहिती नसते.
2/ 11
तोंडलीत व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, सी तसंच पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम यासारखे शरीराला पोषक असणारे अनेक घटक असतात.
3/ 11
फक्त भाजी म्हणून तोंडी लावण्यासाठी नाही तर तोंडली आपल्याला अनेक आजारांपासून आराम देतं. आज आपण याबद्दलच माहिती करून घेणार आहोत.
4/ 11
रक्त शुद्धीकरण- तोंडली शरीरातील रक्त शुद्धीकरण करतं. त्यात रक्त शुद्धीकरण करणारे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा देखील सुरक्षित राहते.
5/ 11
पचनासाठी उत्तम - पडवळमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहते. याच्या नियमित सेवनाने आपल्या सर्व पचनसंबंधी समस्या दूर होतात.
6/ 11
त्वचेला ठेवतं तरुण - तोंडलीत अँटिऑक्सिडंट घटक असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे चेहऱ्यावर सुरुकुत्या येण्याची प्रक्रिया मंदावते आणि तुम्ही अधिक काळ तरुण दिसता.
7/ 11
तुम्ही जर बऱ्याच दिवसांपासून बद्धकोष्ठतेला त्रस्त असाल तर आपल्या आहारात तोंडलीचा समावेश नक्की करा. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.
8/ 11
वजनदेखील होतं कमी- तोंडलीत कॅलरीज आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे तुमचं वजन घटण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या सेवनानं पोट जास्त वेळेसाठी भरलेलं जाणवतं, परिणामी भूक लागत नाही आणि जास्त न खाल्ल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
9/ 11
कावीळ- तोंडली यकृतासाठी अत्यंत फायदेशीर असतं. कावीळ झालेल्या लोकांसाठी तर तोंडली खूपच उपयुक्त आहे. यामुळे यकृताची कार्यक्षमता वाढते आणि तुमची पचनक्रियासुद्धा सुधारते.
10/ 11
रक्तातील ग्लुकोज आणि रक्तदाब ठेवतं नियंत्रित- मधुमेह आणि उच्च रक्तदाब हा एक आनुवंशिक आजार आहे. मात्र आपल्या खाण्यापिण्यात काही बदल करून ते नियंत्रणात ठेवता येतं. तोंडलीमुळे हे दोन्ही आजार नियंत्रणात राहतात.
11/ 11
रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ- पडवळ खाल्ल्यानं आपली रोगप्रतिकारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून आपला बचाव होतो. सध्या कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे तोंडली नक्कीच खायला हवी.