

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजची 16 ऑक्टोबरपासून, तर अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सेलदरम्यान मोबाईल फोनवर घसघशीत सूट देण्यात येत आहे.


One Plus Nord:वन प्लस नॉर्ड काही महिन्यांपूर्वी भारतात 24,999 रुपयांत लॉन्च झाला होता. आता अमेझॉनने आपल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलअंतर्गत हा फोन विशेष सूटमध्ये विक्रीसाठी ठेवला आहे. किंमत अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु हा फोन 20,999 रुपये ते 24,999 रुपयांपर्यंत विक्रीसाठी असू शकतो. कंपनीने आपल्या वेबसाईटवर याचा उल्लेख केला आहे.


iPhone 11: ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अमेझॉन iPhone 11 50 हजारहून कमी किंमतीत विक्री करु शकतात. आयफोन 11 ची किंमत 68,300 रुपये इतकी आहे. त्यामुळे अमेझॉनच्या या डीलमध्ये हा फोन चांगल्या ऑफरमध्ये आहे.


LG G8X: ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरु शकते. LG आपल्या G8X ड्युअल स्क्रीन फोनवर 35000 सूट देत आहे. हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये 49,999 रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. परंतु जीएसटीमुळे याची किंमत वाढून 54,990 रुपये इतकी झाली होती. मात्र LG आता ग्राहकांना एका मर्यादित कालावधीत ऑफर देत आहे, ज्यात G8X केवळ 19990 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.


Samsung Galaxy M51:सॅमसंग Galaxy M51 28,999 रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. मात्र अनेझॉनच्या सेलमध्ये यावर डिस्काऊंट मिळतोय. कंपनीने याच्या विक्रीसाठी अंतिम किंमतीची घोषणा केलेली नाही. परंतु हा फोन 20,999 रुपये ते 28,999 रुपयांपर्यंत उपलब्ध असण्याची शक्यता आहे.


Realme X50 Pro 5G: हा फोन भारतातील पहिला 5G फोन म्हणून लॉन्च करण्यात आला होता. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये या फोनवर मोठी सूट मिळतेय. 41,999 रुपयांचा हा स्मार्टफोन 36,999 रुपयांत विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED स्क्रीन आणि 5G सपोर्ट आहे.


Redmi Note 9 Pro: Uber-hit मिड-रेंज डिव्हाईस Redmi Note 9 Pro ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये सूटसह उपलब्ध आहे. पहिल्यांदाच Redmi Note 9 Pro च्या किंमतीत कमी झालेली दिसणार आहे. परंतु कंपनीने अद्याप याची किंमत जाहीर केलेली नाही. याची किंमत 10,099 आणि याच्या सध्याच्या 16,999 रुपयांपर्यंत असू शकते.


Moto Edge+: मोटोरोलाचा Moto Edge+ कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. या फोनची एमआरपी 89,999 रुपये आहे, जो 64,999 रुपयांत विक्रीसाठी आहे. एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्केहून अधिक एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल.