कदाचित हे वाचायला विचित्र वाटेल पण कोविडने लोकांचे मानसशास्त्र आणि सौंदर्याबद्दलच्या धारणाही बदलल्या आहेत. किमान एका अभ्यासातून तर असच समोर आलं आहे. हा अभ्यास यूकेच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायकॉलॉजीमध्ये करण्यात आला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले की फेस मास्क लोकांच्या चेहऱ्याला केवळ आकर्षकच बनवत नाहीत तर सुंदरही बनवत आहेत. (फोटो - शटरस्टॉक)
कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायकॉलॉजीचे प्रमुख आणि फेस एक्सपर्ट पेंडेफिक म्हणतात की, कोरोनापूर्वी एखाद्याने मास्क घातला होता, तर लोकांचा असा विश्वास होता की एकतर त्याच्या चेहऱ्यात दोष आहे किंवा तो काही आजाराने ग्रस्त आहे. पण, कोविडनंतर या धारणेत बदल झाला आहे. निळे सर्जिकल मास्क घातलेल्या लोकांचे चेहरे अधिक सुंदर किंवा आकर्षक दिसू लागले आहेत. (फोटो - शटरस्टॉक)
या अभ्यासात महिलांची अशी काही छायाचित्रे देण्यात आली होती, ज्यामध्ये मास्क नसलेले चेहरे तर काहींनी मास्क घातलेले होते. असे काही चेहरे ज्यांनी निळा सर्जिकल मास्क घातला होता आणि काही चेहरे ज्यांनी पुस्तकाने अर्धा चेहरा झाकलेला होता. परिणामी, महिलांना असे आढळले की सर्जिकल मास्क घातलेले चेहरे अधिक आकर्षक वाटत होते. (फोटो - शटरस्टॉक)