सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील 9 बकऱ्यांचा फडशा पाडणारा अजगर राज्यभर चर्चेत आहे. अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. बर्मी अजगर सुमारे 5 मीटर लांब असते. ते हरणांपासून मगरींपर्यंत सर्व काही गिळण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. आकाराने छोटा दिसणारा जबडा मूळ आकाराच्या सहापट कसा मोठा होतो? यावर नवीन अभ्यास समोर आला आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
असं असूनही बर्मी अजगर त्यांच्या मूळ असलेल्या आग्नेय आशियामध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. याचे एक कारण म्हणजे मानवाने त्यांच्या अधिवासाचा काही भाग बळकावला आहे. काही बर्मी अजगर फ्लोरिडामध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र, तिथे ते पर्यावरणातील स्थानिक प्रजातींसाठी धोकादायक बनले आहेत. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
नवीन अभ्यासात, बार्टोस्झेक आणि त्याच्या इतर तीन सहकारी संशोधकांनी या महाकाय सापाच्या जीवशास्त्राचा, विशेषत: जवळजवळ प्रत्येक प्राणी खाण्याच्या क्षमतेचा बारकाईने अभ्यास केला. अभ्यासात असे आढळून आले की बर्मी अजगरांनी त्यांचे मोठे रुंद तोंड अधिक उघडण्यासाठी एक विशेष वैशिष्ट्य विकसित केले आहे. त्यांच्या खालच्या जबड्यांमधील अत्यंत लवचिक त्वचा त्यांना अगदी मोठ्या प्राण्यांना गिळण्यास मदत करते, जे मोठ्या प्राण्यांच्या जबड्यांना शक्य नाही. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
साप त्यांची शिकार चावत बसत नाही तर पूर्ण गिळण्याचा प्रयत्न करतात. मानवाच्या आणि इतर सस्तन प्राण्यांच्या खालच्या जबड्याच्या तुलनेत, सापांचा खालचा जबडा थेट जोडलेला नसून लवचिक अस्थिबंधनाद्वारे जोडलेला असतो, ज्यामुळे त्यांचे तोंड अधिक उघडू शकते. बर्मीज सापांच्या खालच्या जबड्याची लवचिक त्वचा त्यांना सामान्य सापांच्या तुलनेत मोठा जबडा उघडण्याची क्षमता देते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
सापांच्या उघड्या जबड्याची त्यांच्या शरीराच्या आकाराशी तुलना करण्यासाठी, संशोधकांनी झाडांमध्ये आढळणाऱ्या तपकिरी सापांची तुलना बर्मी अजगराशी केली. हे छोटे साप पक्षी आणि लहान प्राणी खातात. याद्वारे संशोधकांनी साप किती मोठे प्राणी खाऊ शकतात याचे आकलन केले. त्यांना आढळले की लहान साप त्यांचे तोंड अधिक उघडू शकतात आणि त्यांच्या शरीरापेक्षा मोठी शिकार खाऊ शकतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)