'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा आणि दिपूने या कारणासाठी घेतली राज ठाकरेंची भेट, Photo आले समोर
झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'मन उडू उडू झालं' ही मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांना भावतेय. या दोघांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली.
झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'मन उडू उडू झालं' ही मालिका त्यातील व्यक्तिरेखा त्यांच्या आवडीच्या बनल्या आहेत. इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावतेय.
2/ 5
आता या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
3/ 5
संपूर्ण मुंबईभरात प्रचलित, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित लोकप्रिय कार्यक्रम 'दीपोत्सव' दरवर्षप्रमाणे यंदाही 'शिवतीर्थ' (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे संपन्न झाला.
4/ 5
ऋता आणि अजिंक्य यांच्या सोबतच शर्मिला राज ठाकरे, अमित ठाकरे - मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
5/ 5
या कार्यक्रमानिमित्त ऋता आणि अजिंक्य यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.