एसीपी दिव्याच्या एण्ट्रीमुळं देवमाणूस या मालिकेत नवा ट्विस्ट आहे. आता ती डॉ. अजितकुमार देवचे काळे धंदे जगासमोर आणणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. (Neha Khan/Instagram)
2/ 10
दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. (Neha Khan/Instagram)
3/ 10
अगदी काही दिवसांतच लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या नेहानं खडतर प्रवास केला आहे. या फोटो गॅलरीत पाहूया या अभिनेत्रीचा प्रेरणादायी प्रवास (Neha Khan/Instagram)
4/ 10
नेहाची आई मराठी व वडिल मुस्लीम धर्मिय आहेत. आंतरधर्मीय विवाहामुळं नेहाच्या आईला प्रचंड त्रास झाला. (Neha Khan/Instagram)
5/ 10
नेहाच्या आईला प्रॉपर्टी मिळू नये, म्हणून काही गुंडांनी जोरदार मारहाण केली होती. यामध्ये तिच्या आईला शरीरभर तब्बल 370 टाके पडले होते. (Neha Khan/Instagram)
6/ 10
या मारहाणीचा आळ स्वत:वर येईल म्हणून नेहाचे वडील फरार झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिच्या आईनं हिंमत दाखवून नेहा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला. (Neha Khan/Instagram)
7/ 10
नेहा खान मूळ अमरावतीची आहे. शेजारी राहणाऱ्या एका महिलेमुळं तिच्यात अभिनय करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर तिनं अनेक ठिकाणी ऑडिशन्स वगैरे देऊन काम मिळवली. (Neha Khan/Instagram)
8/ 10
मुंबईत ऑडिशनला येण्यासाठी तिला खूप कसरत करावी लागायची. कधी ट्रेन वगैरे चुकली तर स्टेशनवरच झोपायची. वेळप्रसंगी उपाशी राहून देखील तिनं ऑडिशन्स दिली आहेत. (Neha Khan/Instagram)
9/ 10
किशोरी शहाणे आणि सतीश कौशिक यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या अमरजीत यांनी तिला सुरुवातील काम मिळवून देण्यास मदत केली होती. (Neha Khan/Instagram)
10/ 10
तिनं आजवर ‘बॅड गर्ल’, ‘काळे धंदे’, ‘शिकारी’, ‘हाफ ट्रुथ’, ‘गुरुकुल’, ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ यांसारख्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Neha Khan/Instagram)