वीर चित्रपटानंतर जवळपास 50 किलो वजन तिनं कमी केलं. तरी देखील ती जिथं जाईल तिथं लोक तिला वजनावरुनच प्रश्न विचारतात.
|
1/ 10
वीर या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली झरीन खान ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Zareen Khan/Instagram)
2/ 10
सलमान खानमुळं झरीनचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. मात्र या चित्रपटानंतर तिला फारसं काम मिळालं नाही. कारण वाढलेल्या वजनामुळं अनेकजण तिची खिल्ली उडवायचे. (Zareen Khan/Instagram)
3/ 10
वीरनंतर झरीननं मोठ्या प्रमाणावर आपलं वजन कमी केलं. हेट स्टोरी आणि हाऊसफुल सारख्या चित्रपटांमध्ये तिनं खूपच बोल्ड अशा भूमिका साकारल्या. (Zareen Khan/Instagram)
4/ 10
मात्र त्यानंतरही प्रेक्षकांनी तिच्या जुन्या इमेजवरुनच तिची खिल्ली उडवणं थांबवलं नाही. अलिकडेच IANSला दिलेल्या मुलाखतीत झरीननं या ट्रोलिंगवर व तिच्या वाढलेल्या वजनावर भाष्य केलं. (Zareen Khan/Instagram)
5/ 10
तिनं सलमान खानच्या सांगण्यावरुन वजन वाढवलं होतं. वीर चित्रपटात तिला एका ब्रिटीश तरुणीची भूमिका साकारायची होती. (Zareen Khan/Instagram)
6/ 10
त्यामुळं सलमान खान आणि क्रिएटिव्ह टीमच्या सल्ल्यानुसार तिनं आपलं वजन वाढवलं होतं. (Zareen Khan/Instagram)
7/ 10
पण या चित्रपटानंतर जवळपास 50 किलो वजन तिनं कमी केलं. तरी देखील ती जिथं जाईल तिथं लोक तिला वजनावरुनच प्रश्न विचारतात. (Zareen Khan/Instagram)
8/ 10
ती म्हणाली, “जगभरात असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी केलं किंवा वाढवलं. परंतु त्यांना मात्र ट्रोल केलं जात नाही. मग मला का ट्रोल केलं जातं?” (Zareen Khan/Instagram)
9/ 10
झरीनला वजनासोबतच कतरिना कैफची डुप्लिकेट म्हणूनही ट्रोल करण्यात आलं होतं. (Zareen Khan/Instagram)
10/ 10
झरीन खाननं आतापर्यंत वीर, रेडी, हाऊसफुल, हेट स्टोरी, अक्सर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वजनाचीच कायम चर्चा होताना दिसते. (Zareen Khan/Instagram)