तुम्हालाही मिळू शकते शाहरुख खानच्या बंगल्यात राहण्याची संधी; कसं आहे घर? पाहा PHOTO
अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरीच्या दिल्लीतील घरामध्ये राहण्याची संधी चालून आली आहे. एअरबीएनबीच्या 'होम विथ ओपन आर्म्स’ योजनेमुळे एका विजेत्या जोडप्याला ही संधी मिळणार आहे.


बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) घरामध्ये तुम्हाला राहायला मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दिल्लीतल्या वडिलोपार्जित घरामध्ये तुम्हाला राहता येईल. एअरबीएनबीच्या 'होम विथ ओपन आर्म्स’ योजनेमुळे ही संधी निर्माण झाली आहे.


दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये हे घर असून गौरीने या घराची सजावट केली आहे. किंग खानचं कुटुंब आता मुंबईत राहात असले तरी त्यांच्या आयुष्यात आणि आठवणींमध्ये दिल्लीच्या या घराला विशेष स्थान आहे.


व्यक्तिगत वस्तू आणि जगभरातील जमा झालेली स्मृतिचिन्हे यांनी हे घर भरलं आहे. “होम विथ ओपन आर्म्स’ मोहीमेमुळे पाहुण्यांना बॉलिवुडच्या या सुप्रसिद्ध जोडप्याचा नॉस्टॅल्जिया पुन्हा जगण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे.


विजेत्या जोडप्याला खान कुटुंबियांच्या पसंतीचे जेवण, शाहरुख खानच्या पसंतीचे, तसेच त्याचे यशस्वी सिनेमे पाहाण्याची संधी आणि कुटुंबाकडून स्मृतीचिन्ह म्हणून घरी पर्सनलाइज्ड वस्तूंची भेट मिळणार आहे.


या उपक्रमाबाबत गौरी आणि शाहरुख खान म्हणाले, “आमच्या हृदयात दिल्लीला विशेष स्थान आहे; या शहराला दिलेल्या प्रत्येक भेटीत आमच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात.’’