‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचा आता उत्तरार्ध सुरू झाला असून लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्विटू आणि ओम यांच्या लव्हस्टोरी भोवती ही मालिका फिरत होती. त्यांच्या रिलेशनला स्विटूच्या आईचा आणि ओमच्या बहिणीचा विरोध होता. मात्र हा विरोध आता मावळला असून नुकतंच दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो झी वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.