सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार प्रत्येक व्यक्तीला आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमण्याची आवड असते. अनेक कलाकार सोशल मीडियावर आपल्या बालपणाचे फोटो शेअर करुन आपल्या आठवणींना उजाळा देत असतात. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल होत आहे. ही मुलगी आज एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. जर तुम्हाला अजूनही ओळखलं नसेल तर, आम्ही सांगू इच्छितो कि, फोटोमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी दुसरी कुणी नसून स्वीटू आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि टाईमपाससारख्या मालिका आणि चित्रपटांमधून ती घराघरात पोहोचली आहे. स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. बालपणीच्या या फोटोमध्ये अन्विता फारच गोंडस दिसत आहे.