झी टीव्हीवरील 'ये वादा रहा' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अंकुश अरोरा होय. या मालिकेमुळे अंकुशला मोठी लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत त्याची सह कलाकार म्हणून अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर होती. अंकुशने 2013 मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. 2013 मध्ये अंकुशने 'गुस्ताख दिल' या लाईफ ओकेच्या मालिकेतून पदार्पण केल होतं. तसेच अंकुश 'ये है आशिकी' या मालिकेतसुद्धा झळकला होता. आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करणारा अंकुश फक्त अभिनेताचं नव्हे तर एक उत्तम गायकसुद्धा आहे. अंकुशच्या क्युट लुकवर अनेक तरुण फिदा आहेत.