

माजी मिस युनिवर्स लारा दत्ता भूपती सध्या कुटूंबासोबत युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. भूपती कुटूंबाने नुकतंच क्रोशियातील डब्रोविनिकला भेट दिली. या स्थळाची खासियत म्हणजे प्रसिद्ध गेम ऑफ थ्रोन मालिकेतलं हे घर आहे. तिने या सीरिजची चाहती म्हणून तिथले फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. त्या घरात गेल्याचा आनंद लाराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.


लिनींग टॉवर ऑफ पिसाकडे गेल्यावर पर्यटक ज्या पद्धतीने फोटो काढतात तसेच काहीसे फोटो लारानेही काढले. यात महेश तो कलंडलेला टॉवर सरळ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यात महेशला थोडं यशही आलेलं दिसतं.


यानंतर लाराने मुलीचा गेम ऑफ थ्रोन सीरिजमधील खुर्चीवर बसलेला फोटो शेअर केला. या फोटोत दोन वेण्या घातलेली लाराची मुलगी फारच क्युट दिसत आहे.


लाराने मिशेल आणि अनुषा या तिच्या भाच्यांसोबतचा फोटोही शेअर केला. यावेळी त्यांनी क्रोशियातील Hvar Island येथील डीप सी केव्जना भेट दिली.


क्रोशियात तिने मजामस्ती तर केलीच शिवाय सेलिंगचा आनंदही लुटला. लारा तिच्या या सर्व फोटोंमध्ये फार सुंदर दिसत आहे. यावेळी तिने शर्ट आणि पीन स्ट्रीप शॉर्ट्स आणि स्ट्रॉ हॅट घातली होती.