

तनुश्री दत्ताने 2008मध्ये एका शुटींगदरम्यान नाना पाटेकरनी आपल्याबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आणि अर्थातच चर्चेचं वादळ उठलं. त्यानंतर तनुश्रीच्या बाजूने किंवा नानाच्या बाजूने अनेक लोक चर्चेत उतरले. सगळेजण सोशल मीडियावर आपापली मतं व्यक्त करत आहेत. यामध्ये काही बॉलिवूड कलाकार तिच्या बाजूने आहेत तर काही तिच्या विरोधात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, तनुश्री या काँट्रोवर्सीच्या आधी कुठे होती आणि काय करत होती?


अनेकांना तनुश्री कोण, तिचे गाजलेले चित्रपट कोणते ही माहितीदेखील नसणार. तिने केलेल्या मोजक्याच चित्रपटांमुळे हा चेहरा थोड्या लोकांना माहितीचा आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का तनुश्री दत्ताने तिच्या करिअरची सुरुवात ही चित्रटांमधून केली नाहीय. चित्रपटाच येण्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची.


काही काळ रँपवर चालल्यानंतर तिने 2003 मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला आणि त्यावर्षीचा किताब आपल्या नावार केला. मिस इंडिया झाल्यानंतर तनुश्री तिथेच थांबली नाही तिने पुढे 2004 मध्ये मिस युनिव्हर्स झाली. पण मिस युनिव्हर्स बनल्यानंतरदेखील तिला म्हणावी अशी प्रसिद्धी मिळाली नाही.


आपल्याकडे ब्युटी क्वीन्सनी चित्रपटाकडे वळण्याची जणू प्रथाच आहे. मिस इंडिया, मिस युनिव्हर्स किंवा मिस वर्ल्ड झाल्या की कुठल्याही मॉडेलला बॉलिवूडचा राजमार्गच खुला होतो. तनुश्रीनेदेखील इतर ब्युटी क्वीन्सप्रमाणे बॉलिवूडमध्ये एंट्री केली.


ब्युटी क्वीन झाल्यानंतर लगेच २००५मध्ये तनुश्रीने चॉकलेट आणि आशिक बनाया आपने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. पहिलाच चित्रपट तिने इम्रान हाश्मीसोबत केल्यामुळे तिला त्या चित्रपटानंतर थोडी प्रसिद्धी मिळाली.


आशिक बनया आपनेनंतर तनुश्रीने ढोल,गुड बॉय बॅड बॉय, अपार्टमेंट या सारख्या चित्रपटात काम केलं. पण तिला आपली वेगळी छाप पाडता आली नाही. आतापर्यंतच्या संपूर्ण करिअरमध्ये तिने एकूण 14 चित्रपट केले आणि 2010 नंतर ती चित्रपटसृष्टीतून अचानक गायब झाली.


चित्रपटांपेक्षा तनुश्रीला काँट्रोव्हर्सीमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. चॉकलेट या चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी तिला अभिनेता इरफान खानसमोर विवस्त्र होण्यास सांगितलं असा आरोप तिने केला होता. त्यानंतर तिने अभिनेते नाना पाटेकरांवरदेखील गैरवर्तनाचे आरोप केले. आपल्याविरोधात नानानी मनसेच्या कार्यकत्यांना फोन केला असल्याचा आरोपही तनुश्रीने केला. त्या फोनमुळे मनसे कार्यकत्यांनी तनुश्रीची कार फोडल्याचं तिने सांगितलं.


मग अचानक ८ वर्षांनी तनुश्रीने हा वाद का ओढवून घेतला अशी चर्चा सुरू झाली. काही मीडिया हाउसेसनी तनुश्री बिग बॉसमध्ये येणार असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. त्यामुळे तनुश्री हे बिग बॉसमध्ये जाण्याच्या इच्छेनं तर करत नाही ना, असा आरोप व्हायला लागला.