Samantha -Naga Chaitanya Divorce: नागा चैतन्य आणि समंथा यांच्या नात्यात का आला दुरावा? समोर आलं घटस्फोटाचं कारण
फॅमिली मॅन वेबसीरिजमुळे देशभर लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. काय आहे त्यांच्या Divorce मागचं कारण? पाहा PHOTOS
साउथ सिनेमा जगतातली आवडती जोडी समंथा प्रभू आणि नागा चैतन्य आता एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली.
2/ 8
विभक्त झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून समंथाने आपलं नावही बदललं आहे. अशा परिस्थितीत, त्यांचं 12 वर्षं जुनं नातं तोडण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
3/ 8
नागा चैतन्य कदाचित आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहे आणि त्याची पत्नी असली तरी समंथाने आवडीच्या कलाकारांसोबत काम करू नये, परदेशी शूटिंग टाळावं अशी नागाची इच्छा तिला मान्य नव्हती, असंही एक कारण सांगितलं जात आहे.
4/ 8
अभिनेत्री समंथा पती नागा चैतन्यपेक्षा अधिक यशस्वी आहे. तिला खूप कामं मिळत होती आणि तिला भरपूर संधी देखील आहेत. नातं तुटण्याला हे ही एक कारण मानलं जात आहे.
5/ 8
नागा चैतन्यने त्याचे वडील नागार्जुन आणि आजोबांसारखं स्टारडम मिळवलेलं नाही. नुकत्याच रिलीज झालेल्या 'मंजिली' आणि 'लव्ह स्टोरी' या चित्रपटांमध्ये नागाला यश मिळत आहे.
6/ 8
समंथा या नात्यात राहिली असती तर तिला नेहमी तिच्या पतीच्या मागे राहावं लागलं असतं. असं म्हणतात की तेलुगु लोक जुन्या विचारांचा त्याग करू शकत नाहीत. कारण त्या समाजावर पुरुषसत्ताक संस्कृतीचा प्रभाव मोठा आहे.
7/ 8
नागा चैतन्य आणि समंथा गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांबकोबर होते. 2017 मध्ये दोघांनी गोव्यात मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं होतं. लग्नापूर्वी, त्यांनी सुमारे 8 वर्षे एकमेकांना डेट केलं आणि नंतर विचारपूर्वक ते लग्नबंधनात अडकले. तरीही त्यांचा संसार टिकला नाही.
8/ 8
आता या दोन कलाकारांचे चांगले संबंध राहणार की कटुका येणार याविषयी लोकांमध्ये शंका आहे. कारण त्यांनी आतापर्यंत त्यांच्या विभक्त होण्याच्या कारणाबद्दल काहीही सांगितले नाही. (Image Credit- @ Samantha Ruth prabhu Instagram)