बॉलिवूडचा दबंग सलमान खान नेहमीच त्याच्या कूल स्टाइलसाठी ओळखला जातो. अनेकदा तो जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसतो.
2/ 6
सलमान फर कमी वेळा फॉर्मल कपडे किंवा जीन्सवर टी-शर्टमध्ये दिसतो. पण तरीही त्याच्या स्टाइलचे अनेक चाहते आहेत.
3/ 6
मात्र त्याच्या स्टाइलमध्ये एक गोष्ट नेहमी हायलाइट होते ती अनेकदा सलमानचे कपडे काळ्या रंगाचे असतात. पण हा रंग निवडण्याच्या मागेसुद्धा एक कारण असल्याचा खुलासा नुकताच एका डिझायनरनं केला आहे.
4/ 6
डिझानर ऐशले रेबेलोने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चाहत्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरनं त्याला प्रश्न विचारला, सलमानची स्टाइल बदला, तो नेहमी काळे कपडेच का वापरतो.
5/ 6
युझरच्या या प्रश्नाचं उत्तर ऐशलेनं मजेशीर अंदाजात दिलं. त्यानं लिहिलं, कारण सलमानला दुसरा कोणताही रंग आवडत नाही.
6/ 6
ऐशलेच्या या खुलाश्यामुळे सलमानच्या चाहत्यांना तो काळे कपडे का वापरतो याचं उत्तर मिळालं आहे. तसं या गोष्टीत काहीच शंका नाही की सलमानला काळा रंग खूप शोभून दिसतो.