एमएक्स प्लेअरवर (MX Player)वर आश्रम या वेब सीरिजचं दुसरं पर्व प्रदर्शित झालं आहे. प्रकाश झा (Prakasha Jha) यांनी आश्रमचं (Aashram) दिग्दर्शन केलं आहे. या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने (Bobby Deol)ने प्रमुख भूमिका केली आहे. आश्रमचा पहिला भाग प्रेक्षकांना फारच आवडला होता. दुसऱ्या सीझनवर बरीच टीका होत आहे. प्रदर्शनाच्या आधीच ही वेबसीरिज वादात अडकली होती. या सीरिजमध्ये त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. बॉबी देओलसोबत दिलेल्या बोल्ड सीनमध्ये ती बरीच चर्चेत आली आहे.