Honey Singh: घटस्फोटांनंतर हनी सिंग पुन्हा प्रेमात; त्याची गर्लफ्रेंड नक्की आहे तरी कोण?
प्रसिद्ध रॅपर हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा घटस्फोट झाला आहे. आता त्यानंतर काही दिवसातच हनी सिंग पुन्हा प्रेमात पडला आहे. नुकताच तो गर्लफ्रेंडबरोबर एका कार्यक्रमात दिसल्याने त्याच्याविषयी चर्चा सुरु झाल्या. पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता तो टीना थडानीला डेट करत आहे. कोण आहे ही टीना थडानी जाणून घ्या.
हनी सिंगने नुकतीच दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान टीना थडानीला डेट करत असल्याची घोषणा केली आहे.
2/ 8
हनी सिंगने काही महिन्यांपूर्वी पत्नी शालिनी तलवार हिला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर काही दिवसातच हनी सिंगने त्याच्या नवीन प्रेमाचे नाव उघड केले.
3/ 8
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हनी सिंगची गर्लफ्रेंड टीना थडानी ही कॅनडास्थित मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
4/ 8
हनी सिंगच्या पॅरिस का ट्रिप या गाण्यात ती दिसली आहे. हे गाणे मिलिंद गाबाने गायले आहे. टीना सध्या मुंबईत राहत आहे. टीना एक मल्टी टॅलेंटेड सेलिब्रिटी आहे.
5/ 8
टीना मॉडेल आणि अभिनेत्रीसोबतच ती दिग्दर्शिकाही आहे. टीनाने 'द लेफ्टओव्हर्स' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
6/ 8
टीना थडानी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि सुमारे 60 हजार लोक तिला फॉलो करतात. टीनाच्या इन्स्टा प्रोफाइलमध्ये तिचे एक सो एक ग्लॅमर फोटो पाहायला मिळतात.
7/ 8
दिल्लीतील एका कार्यक्रमात हनी सिंगने त्याचा नवीन अल्बम हनी 3.0 लाँच केला. यावेळी त्याची गर्लफ्रेंड टीना थडानीही तिथे दिसली.
8/ 8
स्टेजवर हातात माइक घेऊन हनी सिंगने त्याची गर्लफ्रेंड टीना थडानी हिची सर्वांना ओळख करून दिली. हानी सिंगने केलेल्या या घोषणेमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.