

बॉलिवूडचं बहुचर्चित कपल सोनम कपूर आणि आनंद आहुजा सध्या त्यांचं मॅरिड लाइफ खूप एंजॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या रोमँटिक फोटोंमध्ये नेहमीच त्यांच्यामध्ये एक चांगलं बाँडिंग दिसून येत. अशातच सोनम-आनंदचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. जे पाहिल्यावर प्रत्येक मुलीला वाटेल, वाह...!! नवरा असावा तर असा. (छाया सौजन्य- विरल भयानी)


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सोनमचा पती आनंद आहुजा तिच्या बुटांची लेस बांधताना दिसत आहे. हे फोटो एका स्टोर लाँचच्या वेळचे आहेत. आनंदचं सर्वांसमोर अशाप्रकारे सोनमच्या बुटांच्या लेस बांधणं सोसल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे. (छाया सौजन्य- विरल भयानी)


एक शूज स्टोर लाँचसाठी सोनम आणि आनंद आहुजा उपस्थित होते. यावेळी सोनमनं मस्टर्ड यलो कलरचा ड्रेस घातला होता आणि त्यावर त्याच कलरचे स्पोर्ट शूज मॅचिंग केले होते. या ड्रेसअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- विरल भयानी)


सोनम आणि आनंदचं लग्न मे 2018 मध्ये झालं होतं. 2018मधील शाही विवाह सोहळ्यांपैकी एक सोनम आणि आनंद यांचं लग्न होतं. त्यांच्या लग्नात बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- विरल भयानी)


सोनम कपूर काही दिवसांपूर्वी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' मध्ये दिसली होती. या सिनेमाच्या निमित्तानं सोनम आणि अनिल कपूर यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली. मात्र सध्या सोनमकडे कोणताही नवा सिनेमा नाही. (छाया सौजन्य- विरल भयानी)