

पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. (West Bengal Assembly Election) राजकीय दृष्टया संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


परिणामी राजकीय पक्षांच्या प्रचाराला देखील जोर चढला आहे. टीएमसी (TMC) आणि भाजपा (BJP) या दोन्ही पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय सेलिब्रिटींना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


मात्र या कलाकारांमध्ये बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


सायंतिका टीएमसी पक्षासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे प्रचारादरम्यान नेत्यांना पाहण्याऐवजी याच अभिनेत्रीला पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


2009 साली घोर संसार या चित्रपटातून तिनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


त्यानंतर टायगर द फायनल मिशन, पापी, आवारा, बिंदास, शुटिंग, हिरोगीरी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


दरम्यान ब्योमकेश बक्षी या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


सायंतिका अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपल्या प्रतिक्रिया देते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)