Mouni Roy Wedding: गोव्यात मौनी रॉयच्या मेहंदीची धम्माल, मंदिरा बेदी ते अर्जुन बिजलानी या खास मित्रांनी लावली हजेरी
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आज बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गोव्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
|
1/ 8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आज बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गोव्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी मौनीच्या प्री वेडिंग कार्यक्रम पार पडले त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/ 8
सध्या कोरोना महामारीची परिस्थिती पाहून मौनी आणि सूरजने आपलं लग्न काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या हळदी समारंभात अर्जुन बिजलानी, मंदिरा बेदी आणि आशका गोराडियासारखे काही खास मित्र दिसून आले.
3/ 8
या फोटोंमध्ये मौनी रॉय पिवळ्या रंगाच्या इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
4/ 8
मौनीच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहेत.
5/ 8
सध्या सोशल मीडियावर मौनी रॉयचे हे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटी कमेंट्स करून अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.
6/ 8
मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न करत आहे. तो दुबईमध्ये एक उद्योजक आहे.
7/ 8
सूरज हा मूळचा बेंगलोरचा आहे परंतु शिक्षण आणि व्यवसायानिमित्त तो परदेशात असतो.
8/ 8
कोरोना नियमांचं पालन करत त्यांच्या लग्नामध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांना आरटी पीसीआर रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे.