अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) सध्या लग्नाच्या तयारीत गुंतली आहे.
|
1/ 5
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2/ 5
फोटोमध्ये कंगना ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे. ती साडी नेसली आहे आणि तिनं ज्वेलरी घातली आहे.
3/ 5
कंगनाचा भाऊ अक्षतचं लग्न होणार आहे. त्यासाठी बधाईचा कार्यक्रम झाल्याचं कंगनाने सांगितलं.
4/ 5
कंगनाने सांगितलं, बधाई ही हिमाचल प्रदेशमधील परंपरा आहे. यामध्ये लग्नाचं सर्वात पहिलं निमंत्रण मामा-मामीला दिलं जातं. कंगनाच्या आईच्या माहेरी म्हणजे आजी-आजोबांकडे हा कार्यक्रम झाला.
5/ 5
अक्षतचं लग्न नोव्हेंबरमध्ये होणार आहे. बधाईचा कार्यक्रम झाल्यानंतर आता सर्वांना निमंत्रण दिलं जाणार आहे, असं कंगना म्हणाली.