भारतीय क्रिकेट टिमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आज भारतातील एक प्रसिद्ध कपल आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात मोठी झेप घेताना दिसत आहेत. याशिवाय नुकतेच ते आई-बाबा देखिल बनले आहेत. विराटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या पत्निविषयी म्हणजेच अनुष्काविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.