

अभिनेता सलमान खान त्याचा आगामी सिनेमा 'भारत'मुळे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील सलमानचा फर्स्ट लुक रिलीज झाला. सलमानच्या या लुकचं चाहत्यांकडून खूप कौतुकही झालं. यानंतर सलमाननं या सिनेमातील एकामागोमाग एक वेगवेगळे लुक शेअर केले.


गुरुवारी (17 एप्रिल)सलमाननं भारतचं आणखी एक नवं पोस्टर शोशल मीडियावर शेअर केलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफसुद्धा दिसत आहे. तसेच सलमान या पोस्टरमध्ये नेव्ही ड्रेसमध्ये दिसत आहे.


भारतच्या या पोस्टरवर 2010 असं लिहिलं असून यात सलमानचा वृद्ध लुक पाहायला मिळत आहे. हे पोस्टर शेअर करताना सलमाननं लिहिलं, 'जेवढे पांढरे केस माझ्या दाढीत आणि डोक्यावर आहेत त्याहून कितीतरी पटींनी माझं आयुष्य रंगीत आहे.'


म्हाताऱ्या माणसाच्या लुकनंतर सलमाननं मंगळवारी (16 एप्रिल) 'भारत'मधील त्याचा 'जवानी जानेमन' लुक शेअर केला. या पोस्टरमध्ये सलमानचा यंग लुक शेअर करण्यात आला. या पोस्टरला 'जवानी हमारी जानेमन थी' असं कॅप्शन दिलं होतं.