'अमित शहांना घट्ट मिठी मारायची इच्छा'; अभिनेत्याने सोशल मीडियावर केली मोठी चूक
अभिनेत्याने थेट गृहमंत्री अमित शहा यांनाच मिठी मारायची इच्छा व्यक्त केली तर मग काय म्हणणार..
|
1/ 5
बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चर्चेत असतात. हे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसह अन्य अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतात. अभिनेता विद्युत जामवालही सध्या अशाच कारणांनी सोशळ मीडियावर चर्चेत आहे..
2/ 5
एका ट्विटमध्ये विद्युत जामवाल याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना गळा भेट घेण्यासंदर्भातील वक्तव्य केलं आहे.
3/ 5
त्याचं झालं असं की अभिनेता आपला मित्र अमित साध याच्यासह सोशल मीडियावर संवाद साधत होता. या ट्विटमध्ये त्याने अमित शाह यांना गळा भेट घेण्यावर वक्तव्य केलं. अमित साद ट्विटरवर मित्र विद्युत जामवाल यांच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत होते.
4/ 5
यावेळी त्यांनी अमित साद याला धन्यवाद देणारी प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांनी चुकून ट्विटमध्ये अमित साधच्या ऐवजी गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं. यामध्ये त्याने लिहिलं की धन्यवाद..अमित शाह, मी तुम्हाला व्हर्चुअल हग करतो..त्याचं हा ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
5/ 5
यानंतर विद्युत जामवाल याने आणखी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी अमित साध याला टॅग केलं. विद्युत जमवाल चित्रपटात बॉडी डबलचा वापर करत नाही. तर कठीण सीन्स आणि स्टंट स्वत: करतो, त्याच्या या गुणांमुळेही तो कायम चर्चेत असतो.,