Aashay Kulkarni: कुत्र्याचं समजून अभिनेत्याने घरी आणलं डुकराचं पिल्लू, नंतर जे घडलं; आशयने सांगितला किस्सा
सध्या मराठीतील रहस्यमय चित्रपट 'व्हिक्टोरिया' प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
सध्या मराठीतील रहस्यमय चित्रपट 'व्हिक्टोरिया' प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
2/ 8
या चित्रपटाच्या निमित्ताने हे कलाकार प्रमोशन करताना दिसून आले. दरम्यान त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या.
3/ 8
नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत आशय कुलकर्णीने आपल्या बालपणीचा एक असा किस्सा शेअर केला. जो ऐकून सर्वच पोटधरुन हसत आहेत.
4/ 8
आशयने सांगितलं की, लहान असताना त्याने कुत्र्याचं पिल्लू समजून घरी डुकराचं पिल्लू उचलून आणलं होतं. त्या पिल्लाला बाल्कनीत ठेवून बिस्कीट वगैरे खाऊ घातलं होतं.
5/ 8
रात्री झोपल्यानंतर जेव्हा त्याचे बाबा बाहेरून घरी आले. तेव्हा त्यांना बाल्कनीतून कशाचा तरी आवाज आला. बाल्कनी उघडताच ते पिल्लू घरभर पळू लागलं.
6/ 8
इतकंच नव्हे तर त्या पिल्लाने देवगघरात शिरून सगळे देव पाडले. आणि इकडे तिकडे धावू लागले.
7/ 8
त्यांनतर आशयच्या वडिलांनी त्याला मारायला सुरुवात केली. अभिनेता म्हणतो मी झोपलो होतो. मला झोपतेच बाबा मारायला लागले. मला कळेना ते असं का करताहेत.
8/ 8
त्यांनतर मी परत कधी कोणतंच पिल्लू घरी आणलं नाही. असं सांगत अभिनेत्याने सर्वांनाच पोटधरून हसायला भाग पाडलं.