विकी कौशल - कतरिनाचा साखरपूडा झाला? मॅनेजिंग टीमने केला असा खुलासा
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या टीमने आता साखरपुड्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
|
1/ 6
मागील काही दिवसांत अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरविषयी फारच चर्चा होत आहे. तर नुकतीच त्यांच्या साखरपुड्याची बातमी देखील आली होती. त्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर त्याचीच चर्चा पाहायला मिळाली.
2/ 6
दरम्यान आता कतरिनाच्या मॅनेजिंग टीमने याबाबत आता खुलासा केला आहे. तर त्यांच्या साखरपुड्याविषयी सत्यता सांगितली आहे.
3/ 6
दरम्यान एका प्रसिद्ध पापराझीने विकी आणि कतरिनाच्या साखरपुड्याच्या चर्चा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या बातमीने जोर धरला होता.
4/ 6
दरम्यान काही वेळानंतर ती पोस्ट हटवण्यात आली. तर कतरिनाच्या टीमकडून फोन करून ही बातमी खरी नसल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय कैतरीना बुधवारी दुपारी बांद्र्यात स्पॉट झाली होती.
5/ 6
त्यामुळे अद्याप तरी या दोघांचाही साखरपुडा झाला नसल्याचं समोर येत आहे. पण विकी आणि कतरिनाचं रिलेशनशिप अनेक दिवस चर्चेत आहे.
6/ 6
२०१९मध्ये सर्वात आधी त्यांना एकत्र एका पार्टीत स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेकदा ते एकत्र दिसले. तर काही महिन्यांपूर्वी अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनने देखील त्याचं अफेअर असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं.