

'राझी', 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' सारखे एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमा देणारा अभिनेता विकी कौशल सध्या असंख्य तरुणीच्या हृदयावर राज्य करत आहे. दोन्ही सिनेमांना मिळालेल्या यशानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. विकीबद्दल अधिकाधिक गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना रस आहे.


काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शोमध्ये विकीनं अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर हरलीननं सुद्धा इन्स्टाग्रामवर विकी सोबतचा फोटो शेअर करत या नात्यावर मोहर लावली होती.


पण आता या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. सध्या सोशल मीडियावर विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरु आहे. यामागंच कारण बॉलिवूड एक अभिनेत्री असल्याचंही म्हटलं जात आहे.


हरलीननं काही दिवसांपूर्वी विकीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. तसंच तिनं काही ब्रेकअप पोस्टही लाईक केल्या यावरुनच हरलीन आणि विकीचं ब्रेकअप झाल्याचा अंदाज लावला जात आहे.


हरलीन सेठी आणि विकी कौशलच्या ब्रेकअप मागचं कारण अभिनेत्री कॅटरीना कैफ असल्याचं बोललं जात आहे. कॅटरीनामुळे विकी आपल्याला फसवतोय असं हरलीनला वाटत असल्यानं तिनं हे नातं संपवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. मात्र विकी किंवा हरलीनपैकी कोणीच यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.


कॅटरीनानं 'तिची जोडी विकी सोबत चांगली दिसेल' असं म्हटल्याचा खुलासा 'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरनं विकी समोर केला होता. मात्र यावर विकीनं कॅटरीना असं काही बोलेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती.