

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन 24 जानेवारी 2021 रोजी त्याची बाल मैत्रिण नताशा दलालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. (Photo Credit: Viral Bhayani)


नताशा दलाल आधीच तिच्या कुटुंबियांसोबत अलिबागला रवाना झाली आहे. आता वरुण धवनही वेडिंग वेन्यूवर स्पॉट करण्यात आला आहे. (Photo Credit: Viral Bhayani)


बॉलिवूडमध्ये दोघांच्या लग्नाची जबरदस्त चर्चा आहे. वरुण-नताशाचे प्रीवेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. (Photo Credit: Viral Bhayani)


वरुण धवन आज अलिबाग येथील सासवने येथील द मॅन्शन हाउस येथे पोहचला आहे. (Photo Credit: Viral Bhayani)


वरुण धवन पोहचण्याआधी दिग्दर्शक शशांक खेतान आणि डिझायनर मनिष मल्होत्रा लग्नास्थळी दाखल झाले आहेत. (Photo Credit: Viral Bhayani)


त्याशिवाय बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही लग्नासाठी अलिबागमध्ये पोहचला आहे. (Photo Credit: Viral Bhayani)


या दोघांच्या लग्नासाठी वेन्यूवर मोठी सुरक्षा तैनात ठेवण्यात आली आहे. प्रायव्हसीची खास व्यवस्थाही केली आहे. (Photo Credit: Viral Bhayani)