सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वांच जगणं कठीण झालं आहे. लॉकडाउनमुळे काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अभिनेता वरुण धवन अशा गरजूंना मदत करणार आहे. याची माहिती त्यानं त्याच्या सोशल मीडियावरून दिली. जे लोक सध्या बेघर आहेत किंवा ज्यांच्याकडे लॉकडाउनमुळे काम नसल्यानं उपासमार होत आहे अशा सर्वांनाच वरुण धवन मदत करणार आहे. याशिवाय तो हॉस्पिटल्समध्ये काम करणारा स्टाफ जसे की, डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी यांच्याही जेवणाची सोय करणार आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यानं अनेक डॉक्टर्स आणि हॉस्पिटल कर्मचारी घरी न जाता तिथेच राहून काम करत आहे. वरुण धवनने डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफसाठी जेवण देण्यास पुढाकार घेतला आहे. ताज पब्लिक वेलफेअर ट्रस्टमार्फत हे जेवण त्यांच्याकडे पोहोचणार आहे. (संकलन : मेघा जेठे.)