मराठी अभिनेता चेतन चिटणीसचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या काही खास गोष्टींवर आज आपण एक नजर टाकणार आहोत. चेतनने 'फोटोकॉपी' या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केल होतं. यामध्ये तो अभिनेत्री पर्ण पेठे सोबत झळकला होता. चेतनने 'वजनदार' या चित्रपटात सुद्धा महत्वाची भूमिका साकारली होती. यामध्ये तो सई ताम्हणकर, प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकर सारख्या तगड्या कलाकारांसोबत झळकला होता. चेतनने हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे. एका हिंदी चित्रपटामध्ये चेतनने बंगाली व्यक्तीची भूमिका साकारली होती. चेतनने आपल्या पहिल्याचं चित्रपटातून चाहत्यांचं मन जिंकलं होतं. चेतन आपल्या फिटनेसकडे सुद्धा विशेष लक्ष देतो. चेतन सतत आपल्याला जिममध्ये घाम गळताना दिसून येतो.