Urmila Nimbalkar : जे उर्मिलाच्या बाबांना नाही जमलं ते लेकानं करुन दाखवलं, अभिनेत्रीनं केला खुलासा
दुहेरी फेम अभिनेत्री उर्मिला निंबाळकर तिच्या मुलाबरोबर म्हणजेच अथांगबरोबर धम्माल करत असते. काम आणि बाळ असं दोन्ही सांभाळून उर्मिला तिची आवड जपताना दिसतेय. बाळामुळे उर्मिलाच्या आयुष्यात खूप बदल झालेत. जे उर्मिलाच्या बाबांनाही जमलं नाही ते तिनं करुन दाखवलं. काय केलंय पाहा उर्मिलाच्या बाळानं.
सर्वांची लाडकी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या घर, बाळ आणि काम अशी तारेवरची कसरत करत आहे.
2/ 10
उर्मिलाचा मुलगा अथांग जवळपास एक वर्षांचा झाला आहे. अथांग जसा मोठा होतोय तशा त्याच्या सवयी बदलत आहेत. त्यानुसार उर्मिलालाही तिचं शेड्यूल बदलाव लागत आहे.
3/ 10
उर्मिलाच्या वडिलांनाही उर्मिलामध्ये जो बदल घडवता आला नाही तो तिच्या लेकानं म्हणजेच अथांगनं घडवला आहे. उर्मिलानं एक गोड पोस्ट शेअर करत हा खुलासा केलाय.
4/ 10
उर्मिला अथांगला घेऊन रोज सकाळ संध्याकाळ चालायला जाते. लहान मुलांच्या गाडीत बसून अथांग छानपैकी फिरायला जातो.
5/ 10
रस्त्यावर असलेले भू भू लोक ( कुत्रा) अथांगचे मित्र झाले आहेत. उर्मिला नेहमीच तिच्या सोशल मीडियावर अथांगचे व्हिडीओ शेअर करत असते. कुत्र्यांना बोलावण्यासाठी अथांगच्या तोंडातून येणारे बोबडे बोल ऐकायला फार छान वाटतं.
6/ 10
रोज उठून आपल्या दोस्तांना भेटायला जाण्याची आता अथांगला सवय लागली आहे. याविषयी उर्मिलानं एक स्टोरी शेअर करत सांगितलं आहे.
7/ 10
उर्मिलानं अथांगचा त्याच्या आजोबांबरोबरचा एक फोटो शेअर केलाय. तिनं म्हटलंय, 'आम्ही रोज पहाटे 5 वाजता उठतो आणि पाऊस थांबला की लगेचच मॉर्निंग वॉकला जातो'.
8/ 10
'जे माझ्या आजोबांना जमलं नाही, उर्मिलाला लवकर उठायला लावणे वगैरे ते आम्ही करुन दाखवलं!'
9/ 10
'आईला चांगल्या सवयी लावण्यासाठी आमचा जन्म झालाय', असं अथांगच्या मनातल्या गोष्टी उर्मिलानं सांगितल्या आहेत.
10/ 10
सध्या अथांग आणि उर्मिलाच्या फोटोंना तिच्या चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. चाहत्यांकडून अथांगवर प्रेमाचा वर्षाव होतोय.