अभिनेत्री उर्फी जावेदची विचित्र फॅशन स्टाइल काही आता कोणासाठी नवीन राहिलेली नाही. विचित्र फॅशन स्टाइल आणि कपड्यांमुळे ट्रोल होणारी उर्फी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देते सर्वांनाच माहिती आहे. अगदी सोशल मीडियावरील ट्रोलर्स असुदेत किंवा प्रत्यक्ष आयुष्यातले उर्फी सगळ्यांनाच तिच्या स्टाइलनं उत्तर देताना दिसते. अगदी राजकाऱ्यांना देखील उर्फीनं सडेतोड उत्तर दिलेलं आहे. उर्फी नुकतीच एका प्रोग्रामला गेली होती. जिथं तिनं घातलेल्या कपड्यांमुळे ती चांगलीच ट्रोल झाली. 'रमजान महिन्यात तरी नीट कपडे घालावे' त्याचप्रमाणे 'तू मुस्लिम आहेस हे विसरू नकोस', असं म्हणत उर्फीला चांगलंच सुनावण्यात आलं. यावर ट्विट करत उर्फीनं लिहिलंय, "नग्न तर सगळेच आहेत. फरक एवढाच आहे की मी कपड्यामुळे आणि ते विचारांनी नग्न आहेत". उर्फीच्या ट्विटवर तिला अनेकांनी पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला आहे.