'विसरू नकोस तू मुस्लिम आहेस'; रमजान महिन्यात उर्फीचा अतरंगी कपड्यात धिंगाणा, नेटकऱ्यांनी शिकवली अक्कल
मुस्लिम धर्मियांसाठी महत्त्वाचा आणि पवित्र असा रमजान महिना सुरू झाला आहे. या महिन्यात उर्फीचे उर्फीचे अतरंगी कपडे पाहून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे.
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते.
2/ 9
उर्फीवर कितीही टिका झाली तरी ती तिच्या कपड्यांची स्टाइल काही सोडायला तयार नाहीये.
3/ 9
उर्फीचा बोल्डनेस पुन्हा पाहायला मिळाला आहे. नुकत्याच फंक्शनमध्ये उर्फी अशाच विचित्र फॅशन स्टाइलमध्ये पोहोचली होती.
4/ 9
बॉलिवूड आणि टेलिव्हिजनचे अनेक मोठे लोक फंक्शनला आले होते. त्यांच्याबरोबरचे फोटो उर्फीनं शेअर केलेत.
5/ 9
उर्फीचा हा अवतार पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिची शाळा घेतली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यात उर्फीची अशी वेशभूषा पाहून नेटकरी चांगलेच तापले आहेत.
6/ 9
"तू मुस्लिम आहेस हे विसरू नकोस", असा सल्ला काहींनी उर्फीला दिला आहे.
7/ 9
"रमजानच्या महिन्यात तरी चांगले कपडे घालायला पाहिजे होते. हा रमजानचा अपमान आहे", असंही अनेकांनी म्हटलं आहे.
8/ 9
तर "कोणत्या जनावराची हाड घालून आली आहेस?", असंही अनेकांनी उर्फीला तिच्या कपड्यांवरून विचारलं आहे.
9/ 9
उर्फीला मात्र या ट्रोलिंगचा तीळमात्र फरक पडत नसल्याचं पाहायला मिळत आहे.