श्रद्धा आर्याने आपले हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सर्वांनाचं घायाळ केलं आहे. 'कुंडली भाग्य' या मालिकेतून श्रद्धा घराघरात पोहोचली आहे. यामध्ये ती 'प्रीता'च्या भूमिकेत दिसून येते. साधी भोळी असणारी प्रीता सर्वांनाच खूप भावते,आपलीशी वाटते. मात्र प्रीता म्हणजेच श्रद्धा रियल लाईफमध्ये खूपच हॉट आणि बोल्ड आहे. श्रद्धा सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत आपल्या हॉट फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना भुरळ पाडत असते. श्रद्धाच्या प्रत्येक फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. श्रद्धाने आपल्या करीयरची सुरुवात, 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार' या कार्यक्रमातून केली आहे. यामध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. श्रद्धाने तुम्हारी पाखी, मैं लक्ष्मी तेरे आंगण की, ड्रीम गर्ल यांसारख्या मालिकांमध्ये काम केल आहे. श्रद्धाने फक्त मालिकाच नव्हे तर अनेक चित्रपटात सुद्धा काम केल आहे. निशब्द, वंदे मातरम्, गोडवा, रेमो यांसारख्या चित्रपटात श्रद्धानं अभिनय केला आहे. 'कुंडली भाग्य' मालिकेमुळे श्रद्धाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. तिची ही भूमिका खुपचं पसंत केली जात आहे. तसेच या मालिकेतील प्रीता आणि करणची जोडी चाहत्यांमध्ये खुपचं प्रसिद्ध आहे.